- वृत्तपत्र विक्रेत्यांची आरोग्य तपासणी , खबरदारी म्हणून संघटनेचा उपक्रम.
सांगली (दि.26) -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सांगली मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. महापालिकेच्यावतीने ही आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली असुन तीनही शहरात स्वतंत्र ठिकाणी तपासणी होत आहे.
आयुक्त नितिन कापडणीस यांनी यासाठी सहकार्य केले. डॉ. रविंद्रकुमार ताटे हे आरोग्य तपासणीचे नियोजन करीत आहेत.
सांगली शहरात पंचमुखी मारूती रोडवर असणार्या महापालिका दवाखान्यात वृत्तपत्र विक्रेत्यांची तपासणी होत आहे. तीन दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे. मिरज शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची आरोग्य तपासणी आज सोमवारपासुन मिरज मार्केट परिसरात असणार्या आरोग्य केंद्रात सुरू होत आहे. गुरूवारपासुन कुपवाड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची तपासणी कुपवाडमध्येह होणार आहे. सांगलीत आज सोमवार व उद्या मंगळवारी राहीलेल्या विक्रेत्यांची आरोग्य तपासणी होणार आहे.
सांगली आरोग्य केंद्रातील डॉ. विजय ऐनापुरे, विजय थोरात, नर्स मिनल दळवी, लॅब टेक्नीशियन अर्चना चव्हाण, संजय निकम, शिपाई सुधिर लवटे यांचे सहकार्य मिळत आहे.
ग्रामिण भागातील वृत्तपत्र एजंटांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन लवरकच त्यांचीही तपासणी सुरू होईल अशी माहीती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिली.
आरोग्य तपासणीच्या या कामासाठी राज्य संघटना प्रतिनिधी मारूती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हा संघटक सचिन चोपडे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, सांगली शहर अध्यक्ष अमोल साबळे, जेष्ठ विक्रेते सुरेश कांबळे, दिपक वाघमारे, संदिप गवळी, सागर घोरपडे, कृष्णा जामदार, नागेश कोरे आदीं प्रयत्न करीत आहेत