वृत्तपत्रांनी विश्‍वासहर्ता जपली आहे-संतोष भोसलेे.

वृत्तपत्रांनी विश्‍वासहर्ता जपली आहे-संतोष भोसलेे.



 सांगली - लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनी लॉकडाऊनच्याच काळातच नवे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपली विश्‍वासहर्ता जपली असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष भोसले यांनी केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावं, नागज परिसरातील ग्रामीण पत्रकार ,वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्र घेऊन येणार्‍या पायलटगाड्यांचे चालक आणि काही ग्रामस्थ यांना संतोष भोसले यांच्या कडून सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.
  कोरोना विषाणूच्या प्रसार व प्रादुर्भाव होण्याची भीती असताना पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते सर्व सामान्य वाचकांना वृत्तपत्र पोहोच करून जागतिक घडामोडींची माहिती पोहचवत आहेत हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांना छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही संतोष भोसले यांनी सांगितले.
  सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न कवठेमहांकाळ तालुका विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महारुद्र कुंभार यांनी संतोष भोसले यांच्या कार्याचे कौतुक करून ग्रामीण भागातील वर्तमानपत्र व्यवसायाशी संबंधित असलेल्या पत्रकार व विक्रेत्यांची दखल घेऊन त्यांना एक प्रकारे सुरक्षा कवच दिल्याबद्दल आभार मानले.
  यावेळी पत्रकार शशिकांत पोरे, विठ्ठल नलवडे, शिवाजी देसाई, तानाजी पवार यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते अनंत गोरे, नबीलाल तांबोळी, तानाजी पवार(विक्रेते),राजू कोळी, आकाश कुंभार आदींसह ग्रामस्थ सोशल डिस्टन्स राखून उपस्थित होते.