विटा यंत्रमाग व अनिल यंत्रमाग च्या संयुक्त सहभागाने यंत्रमाग कामगारांना किराणा साहित्य प्रदान .



विटा यंत्रमाग व अनिल यंत्रमाग च्या संयुक्त सहभागाने यंत्रमाग कामगारांना किराणा साहित्य प्रदान .

 

विटा - विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी संघ  व अनिल यंत्रमाग कापड उत्पादक संघ व यंत्रमागधारकांच्या संयुक्त सहभागाने केरोनाच्या पार्श्वभुमीवर व १मे कामगार दिनानिमीत्त विट्यातील ९०० यंत्रमाग कामगार,वहिफणीवाले, जाॅबर,घडीवाले,बिगारी कामगारांना बंदच्या पार्श्वभुमीवर किमान १० दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य वितरीत करण्यात येत आहे.याचा शुभारंभ आज रोजी प्रांताधिकारी बर्गेसो,तहसिलदार हृषीकेश शेळके,सहकारी संस्था निबंधक शेखसो,विटा नगरपरीषद मुख्याधिकारी अतुल पाटील व विटा सहा.पोलिस निरिक्षक झाल्टे यांचे उपस्थितीमध्ये करण्यात आले.यावेळी विटा यंत्रमाग अध्यक्ष किरण तारळेकर,सुरेश म्हेत्रे,अनिल यंत्रमाग चेअरमन वैभव म्हेत्रे,दत्ताभाऊ चोथे,शिवाजी कलढोणे,अनिल चोथे,शशीकांत तारळेकर,पोपट चोथे,विनोद तावरे,नितीन तारळेकर,सचिन रसाळ,विपुल तारळेकर,अविनाश चोथे,राजु भागवत  यांची उपस्थिती होती.

केरोना संक्रमनाच्या प्रतिबंधासाठी विट्यातील यंत्रमाग २० मार्चपासून बंद आहेत या काळात प्रत्येक यंत्रमागधारकाने आपापल्या पातळीवर कामगारांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.या पार्श्वभुमीवर यंत्रमाग संघटना म्हणुन या दोन्ही संस्थांनी एकत्रीत कामगारांप्रती आपली जबाबदारी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.सोशल डिसन्सिंगचे काटेकोर पालन करुन वितरण व्हावे याचे नियोजन करण्यात आले.