म्हसवड येथील शिवसैनिकां मार्फत गरजूंना किराणा व भाजीपाला वाटप.
म्हसवड - राज्याचे पर्यावरणमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार म्हसवड येथील शिवसैनिकांनी लाँकडाऊनच्या काळात वळई ता. माण येथील कुठूंबांची अन्नधान्या वाचून सुरु असलेली उपासमार दूर केल्याने या कुठूंबांना थोडे दिवसका होईना संकटकाळात मदत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिवसेना नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री मा.ना.आदित्य साहेब ठाकरे यांना वळई,ता. माण,जि.सातारा येथील ऊसतोडी कामगार असणाऱ्या कुटुंबातील सदस्य युवराज काळेल यांनी फोन करुन धान्य व किराण्याच्या कमतरतेची समस्या कानावर घातली व मदतची अपेक्षा व्यक्त केली होती.
कार्यतत्पर असलेले शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री मा.ना.आदित्य साहेब ठाकरे यांनी त्यांचे स्विय सहायक मा.विनोदजी ठाकुर यांच्या मार्फत सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांना संपर्क साधण्यात आला.त्यांनी माणखटावचे शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांना याविषयी संपर्क करुन माहिती दिली. गोरेंनी म्हसवड शहरप्रमुख राहुल मंगरुळे,संग्राम शेटे यांना मदत तातडीने पोहचवण्याविषयी सुचना केली त्याप्रमाणे युवराज काळेल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कमतरते विषयी शिवसैनिकांनी माहिती घेतली. माहिती घेऊन वळई ता. माण येथील तीन कुटुंबांना तातडीने धान्य, किराणा तसेच भाजीपाला अशा जिवनावश्यक वस्तुंची पुर्तता करण्यात आली. यावेळी म्हसवड शहरप्रमुख राहुल मंगरुळे, उपतालुकाप्रमुख अंबादास शिंदे, युवासेना शहराध्यक्ष सोमनाथ कवी, माजी नगरसेवक संग्राम शेटे, उपशहरप्रमुख आनंद बाबर, आदित्य सराटे,चंद्रकांत गुरव,प्रितम तिवाटणे, अक्षय देशमुख व शिवसैनिक उपस्थित होते.