राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी व मा.रामभाऊ घोडके (बापू) फौंडेशन मार्फत ६० हजार रक्कमची औषधे डॉक्टरांना वाटप.

राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी व मा.रामभाऊ घोडके (बापू) फौंडेशन मार्फत ६० हजार रक्कमची औषधे डॉक्टरांना वाटप.


सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाउन असल्यामुळे नागरिक घराबाहेरपडू शकत नाही. हाच विचार करून, समाज्यासाठी मदत नसुन हे आमचे कर्तव्य आहे जिल्ह्याचे पालकमंत्री   मा.जयंतराव पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील मा.रामभाऊ घोडके (बापू) फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १६ मध्ये गरजू नागरिकांना तसेच लहान मुले व वृद्ध लोकांना औषधोपचारासाठी बाहेर पडता येत नाही. प्रभागातील समस्या चा विचार करून या मा.रामभाऊ घोडके (बापू) फाउंडेशन ने प्रभागातील १७ डॉक्टरांना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजय बजाज साहेब यांच्या हस्ते औषध वाटप करण्यात आले. या औषधाचा उपयोग गोरगरीब गरजू लोकांना डॉक्टरांच्या मार्फत मोफत औषध उपलब्ध व्हावे या उद्देशाने डॉक्टरांच्या हाती औषध पुरवण्यात आले. या औषधांचे अंदाजित रक्कम पन्नास ते साठ हजार रुपये इतकी असून हे औषध भागातील सतरा डॉक्टरांना वाटप करण्यात आल्याने डॉक्टरांनी या फाउंडेशन चे आभार मानले व त्या भागातील गोरगरीब जनतेला या औषधाचा नक्कीच उपयोग होईल अशी गवाही डॉक्टरांनी दिली. तसेच या फाउंडेशन'ने  प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांना जीवनाश्यक साहित्याचे व मास्क चे वाटप केले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजय बजाज ,राष्ट्रवादी काँग्रेस डाँक्टर सेल चे अध्यक्ष मा.डॉ.पाटील. मा.नगरसेवक सागर घोडके, फाउंडेशन अध्यक्ष  अमोल घोडके,सौ.दीप्ती घोडके,उमेश वाईगडे, रशिद आंबी,सुरेश गायकवाड, निलेश घोडके,संदिप आरगे,सुरेश धावडे,तोफिक फकीर,उमेश पाटील ,पोपट पाटील आणि प्रभागातील डॉक्टर्स व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.