पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने आरएसपी अधिकारी व सर्व पदाधिकारी यांना सॅनिटायझर वाट.
सांगली - पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने आरएसपी टीमच्या (सेवाभावी संस्था) सर्व अधिकारी व सर्व पदाधिकारी यांना गांधी चौक, मिशन हाॅस्पीटल, मिरज येथे सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला व प्रोत्साहन दिले. तसेच त्यांचे उल्लेखनिय राष्ट्रीय कार्याबद्दल अभिनंदन केले. डाॅ. राजेंद्र मेथे यांनी कोविड 19 बाबत विशेष काळजी कशी घ्यावी याबाबत आरएसपी अधिकारी व सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य महासमादेशक, आरएसपी, मा. अरविंद देशमुख, जिल्हा समादेशन आरएसपी श्री. जनार्दन झेंडे, पोलिस इन्स्ट्रक्टर, एएसआय, कृष्णदेव कांबळे, विष्णू बुरूंग, हेड काॅन्स्टेबल अशोक कोळी, अतुल माळी, मनोज टोणे तसेच आरएसपी अधिकारी प्रकाश पाटील, अमेय पाटील, विशाल कांबळे, अभिजित विभुते, सोपान भोसले, नामदेव लवटे, अभय कर्नाळे, तर महिला आरएसपी अधिकारी म्हणून श्रीमती ललिता माळी, सौ. शिंगाडे मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.