सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसर नगरसेवक शेखर इनामदार यांच्या पुढाकाराने औषध फवारणी.
सांगली : लॉगडाऊन शिथिल झाल्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाहणाबरोबर नागरिकांची वाढती गर्दी पाहता नगरसेवक शेखर इनामदार यांनी पुढाकार घेत सिव्हिल परिसरात औषध फवारणी करवून घेतली
सोमवार पासून लॉगडाऊन शिथिल झाल्यामुळे नागरिकांची शहरात वर्दळ वाढली आहे. याचबरोबर सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्येही रुग्णाची संख्या वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आज नगरसेवक शेखर इनामदार यांनी स्वता लक्ष देऊन सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात मनपाच्या आरोग्य टीमच्या माध्यमातून औषध फवारणी करून घेतली. सिव्हीलच्या पोर्चपासून ते गेटपर्यंत सर्वत्र ही औषध फवारणी शेखर इनामदार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.