कोरोनाची पूर्ण तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश द्या - तानाजी सावंत

कोरोनाची पूर्ण तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश द्या - तानाजी सावंत.


 


       


 


सांगली - सांगली जिल्ह्यात पुणे, मुंबईसह राज्यातुन व राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. जिल्हा सीमेवर या लोकांची कोरोनाबाबत परिपूर्ण तपासणी न करता केवळ लक्षणे विचारून शिक्के मारून सोडले जात आहे, यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत परिपूर्ण तपासणी करूनच संबंधितांना प्रवेश द्यावा अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी केली आहे. श्री सावंत यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्हाबाहेरून आलेले लोक कोरोना बाधीत आढळून आले आहेत किंवा त्यांच्या संपर्कातील लोकं. सद्यस्थितीत मुंबई पुण्यावरून जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात लोकं येत आहेत त्यांना मेडिकल ऑफिसर लक्षणे विचारून शिक्के मारून घरी पाठवित आहेत. परंतु हे लोक घरी जाऊन इतर लोकांच्या संपर्कात येत आहेत. नंतर त्यापैकीच काही लोकांना कोरोना होत असल्याचे पुढे येत आहे. अशामुळे घरातील व इतर लोकांनाही यांचा धोका उत्पन होऊ शकतो. साळशिंग सारखे प्रकरण त्याचे एक उदाहरण आहे. ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने लोकं रहात असल्याने व सार्वजनिक पाणीपुरवठा, शेती, दुकानासह अनेक ठिकाणी लोकं एकत्र येत असतात. त्यामुळे अशा लोकांमुळे गावाला कोरोनाचा धोका अधिक निर्माण होऊ शकतो, तरी आपण कोल्हापूरच्या धर्तीवर धोरणात्मक निर्णय घेवून मुंबई पुणे आणि रेड झोन मधून येणाऱ्यांना केंद्र सरकारच्या मानक प्रणाली नुसार जिल्हाधिकारी सांगली यांच्या समती शिवाय परवानगी देवू नयेत. आलेल्या लोकांची कोरोना तपासणी करावी व पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहूनच अशा लोकांना संस्था किंवा होम काॅरंटाईन करावे. अन्यथा जिल्यातील ग्रामीण भागात याचा धोका अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही.