सूट मिळाली म्हणून गैरफायदा घेऊ नका, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन करू : हसन मुश्रीफ

सूट मिळाली म्हणून गैरफायदा घेऊ नका, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन करू : हसन मुश्रीफ


 


मुंबई : देशात आणि राज्यात आजपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. मात्र नागरिक मिळालेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेत असून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गर्दी करताना दिसत आहेत. यावर राज्याचे मात्री हसन मुश्रीफ यांनी जनतेला इशारा दिली आहे. नियमांचे पालन करा अन्यथा अजून कडक नियम करण्यात येतील असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.


ते म्हणाले की, सव्वा महिना लॉकडाऊनमुळे शुकशुकाट होता, आज ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर जणू काही कोरोना संपलेला आहे, हद्दपार झालेला आहे आणि त्याच्यावर आपण विजय मिळवला आहे अशा थाटात आज कोल्हापूर आणि कागलमध्ये गर्दी दिसली.