पोलीस निरीक्षक मा. अजय सिदंकर यांचा भव्य सत्कार.
सांगली - बरोबर 28 दिवस कंटेनमेटं झोन च्या झळा सोसून. कोणताही नवा बाधित रुग्ण निष्पन्न न झाल्याने फौजदार गल्ली ने सुटकेचा निश्वास टाकला. या प्रचंड दडपण व तणावाखाली नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे महत्वाचे कार्य करणारे पोलीसवर्ग व त्यांचे सेनापती , शहर पोलीस निरीक्षक मा. अजय सिदंकर यांनी केले. या सर्वांचे फौजदार गल्लीतील नागरीकाच्यां वतीने , दैनिक तरुण- भारत चे मुख्य संपादक मा. मंगेश मंत्री यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यांचे संयोजन मा. युनूस महात व नामदेव चव्हाण यांनी केले होते.
यावेळी नगरसेवक मा. मंगेश चव्हाण , मा. करीमभाई मेस्त्री , विपुल किरीपाळे , पैलवान मा. भोला जाधव , नासीरभाई जमादार, मा. अमन शेठ पठाण , युवक नेते मा. लालूभाई मेस्त्री , जावेद महात, जुनेद महात, दत्तात्रय साळुंखे, ईलाही ङिग्रजे आदी उपस्थित होते .