पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती निमित्त आंबा व नारळ रोपांचे वृक्षारोपण
वाळवा:
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त कोरोनाच्या जागतिक
संकटामुळे सार्वजनिक सर्व कार्यक्रम रद्द केले होते. शासनाच्या आदेशाचे पालन करून क्रांतिवीर
नागनाथअण्णांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या जनतेने उत्स्फुर्तपणे कोणतीही घाई गर्दी न करता सुरक्षित अंतर
ठेऊन इथेनॉल प्रकल्पाच्या आवारात हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे मार्गदर्शन मा.वैभवकाका नायकवडी
यांच्या हस्ते आंबा व नारळ ८ झाडांचे वृक्षारोपण करणेत आले. त्यावेळी ते म्हणाले, हुतात्मा किसन अहिर
विद्यालयाच्या स्थापनेपासून डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी प्रतिकूल परिस्थिती आंबा व नारळ झाडांचे
वृक्षारोपण करून आपल्या परिसरात हजारो झाडांचे संगोपन केले आहे. अण्णांच्या ८० व्या वाढदिवसापासून
आपण हुतात्मा कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकन्यांना अल्प दरात आंबा व नारळ फळ झाडांचे वाटप
दरवर्षी करत आहोत. तेव्हा पासून कारखाना कार्यक्षेत्रात व हुतात्मानगर सोनवडे येथे हजारो वृक्षाची लागवड
करून यशस्वी संगोपन केले आहे. त्यामुळे अण्णांनी जे स्वप्न पाहिले होते ते साकारण्याचा आपण प्रयत्न केला
आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे फळ झाडांचे वाटप आपण केलेले नाही. त्यामुळे प्राथनिधीक स्वरूपात
आंबा व नारळ फळझाडांचे वृक्षारोपण करून अण्णांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत.
भविष्यात नेहमीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना फळ झाडांचे वाटप केलेले आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी हुतात्मा कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबुराव बोरगांवकर, संचालक शंकर कापीलकर,
मारूती पाटील, नारायण पाटील, अरूण यादव, अशोक खोत, भगवान अडिसरे, यशवंत बाबर, कोंडीबा मस्के,
कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख, शेती अधिकारी चव्हाण, चिफ केमिस्ट बी.एस.माने,
फायनान्स मॅनेजर जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.