अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन तासात ‘सारथी’ला  ८ कोटी निधी.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन तासात ‘सारथी’ला  ८ कोटी निधी.
    ‘सारथी’ला ८ कोटी रुपये उपलब्ध केल्याचे पत्र निर्गमित.


  • मुंबई, दि. ९ जुलै - मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला ८ कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे.
    उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. यानिमित्ताने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.आज सकाळी ११ वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत ८ कोटी देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण २०१९ /प्र.क्र.११७/महामंडळे, दि. ९ जुलै २०२० निर्गमित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे ७ कोटी ९४ लाख ८९ हजार २३८ रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


Popular posts